ग्रामपंचायत वाटेगावची विशेष घोषणा – घरपट्टी व पाणीपट्टीवर सूट
- Rohit More
- Sep 25
- 1 min read
ग्रामपंचायत वाटेगाव (ता. वाळवा, जि. सांगली) यांनी जाहीर केलेल्या नोटीशीनुसार, सन २०२५-२०२६ या वर्षाची घरपट्टी व पाणीपट्टी भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
📌 महत्वाचे म्हणजे –👉 ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत घरपट्टी व पाणीपट्टी भरल्यास, भरलेल्या घरपट्टीच्या रकमेवर थेट ५% सूट देण्यात येणार आहे.
ही योजना ग्रामस्थांसाठी मोठी दिलासा देणारी आहे. वेळेत कर भरणे हे केवळ जबाबदार नागरिकाचे कर्तव्य नसून, गावाच्या विकासासाठीही अत्यंत आवश्यक आहे.
ग्रामपंचायतीचे आवाहन
वाटेगावातील सर्व नागरिकांनी आपली घरपट्टी व पाणीपट्टी लवकरात लवकर भरून ग्रामपंचायतीस सहकार्य करावे.आपल्या लहानशा योगदानातून गावातील विकासकामांना गती मिळणार आहे.
✍️ गावाचा विकास, आपली जबाबदारी!
Comments