top of page

"महा श्रमदान: एक दिवस, एक तास, एक साथ" – ग्रामपंचायत वाटेगाव

ग्रामपंचायत वाटेगाव (ता. वाळवा, जि. सांगली) तर्फे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. स्वच्छतेबद्दल अधिक जनजागृती होऊन गावकऱ्यांमध्ये स्वच्छतेची सवय दृढ व्हावी या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

📌 उपक्रमाचे नाव

"महा श्रमदान: एक दिवस, एक तास, एक साथ"

📅 दिनांक व वेळ

👉 गुरुवार, दि. २५/०९/२०२५👉 सकाळी १०.०० वाजता👉 ठिकाण: मुलांची शाळा क्र. २ व नागोबा पाडा परिसर

कार्यक्रमाचे वैशिष्ट्य

या स्वच्छता मोहिमेत गावातील लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका-मदतनीस, आशा सेविका, शाळकरी मुले, शिक्षक, विद्यार्थी तसेच इतर संस्था सक्रीय सहभाग घेणार आहेत.

ग्रामपंचायतीचे आवाहन

ग्रामपंचायतीकडून सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की, पाटी, खुरपे, झाडू इ. साहित्य घेऊन या श्रमदानात सक्रीय सहभाग नोंदवावा आणि गावाच्या स्वच्छतेस हातभार लावावा.

✍️ स्वच्छ गाव – सुंदर गाव, आपल्या सहभागाने होणार घडामोड!

Recent Posts

See All
ग्रामपंचायत वाटेगावची विशेष घोषणा – घरपट्टी व पाणीपट्टीवर सूट

ग्रामपंचायत वाटेगाव (ता. वाळवा, जि. सांगली) यांनी जाहीर केलेल्या नोटीशीनुसार, सन २०२५-२०२६ या वर्षाची घरपट्टी व पाणीपट्टी  भरण्याची...

 
 
 

Comments


Untitled-1eeee.png

2023 - 2025 - Designed by Rohit More ( 96592 91592 )

Information by Rahul Vedpathak

bottom of page